मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल ढिकले कुटुंबियांचे सांत्वन केले
नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. २५ : नाशिक (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. या दु:खद घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार राहुल ढिकले यांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच कुटुंबियांच्या दुःखात शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0