गटशेतीमुळे शेतकऱ्यांची ताकद वाढते; जलसंधारणाची कामे १५ दिवसांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटशेती आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व ताकद वाढत असल्याचे सांगत 'पाणी अडवा, पाणी जिरवा' अंतर्गत जलसंधारणाची अपूर्ण कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्यभरातील शेतकरी गट, महिला बचत गट आणि कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Jun 29, 2026 - 23:26
 0  2
गटशेतीमुळे शेतकऱ्यांची ताकद वाढते; जलसंधारणाची कामे १५ दिवसांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, गटशेती, शेतकरी गट, पाणी अडवा पाणी जिरवा,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. २९ : गटशेती आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची ताकद वाढते तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यंदाचे वर्ष पावसाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याचे नमूद करत त्यांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' अभियानांतर्गत गावांमधील जलसंधारणाची अपूर्ण कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

यावेळी मुख्यमंत्री कृषी विद्यापीठांतील प्राध्यापक, वैज्ञानिक आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींचे कौतुक करत म्हणाले की, शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान पोहोचविण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शेतकरी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने शेती करत असल्याने त्यांना आर्थिक आणि सामाजिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध शेतकरी गटांशी थेट संवाद

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी गट, कृषी विभागाचे अधिकारी आणि 'उमेद' अभियानाच्या मार्गदर्शकांशी थेट संवाद साधला. या संवादादरम्यान अनेक शेतकरी आणि महिला बचत गटांनी आपले अनुभव मांडले.

१६ महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २४ एकर क्षेत्रावर सामूहिक शेती करणाऱ्या चैत्राली यांनी गटशेतीमुळे झालेला बदल आणि स्वतःचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. नंदुरबारचे सहायक कृषी अधिकारी अर्जुन पावरा यांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांसोबत काम करतानाचे अनुभव मांडले.

नाशिकच्या अन्नदाता शेतकरी गटाने 'फार्मर कप'च्या शुभारंभानंतरच ५ लाख रुपयांची बचत केल्याची माहिती दिली. चंदगडच्या प्रभाग समन्वयक लीना लोबो यांनी तरुणांमध्ये शेतीची आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

ठाण्यातील जय भवानी भात उत्पादक शेतकरी गटाने विषमुक्त शेती आणि स्वच्छता अभियानातील कामाचा आढावा सादर केला. महाडचे संचित पार्टे यांनी 'फार्मर कप'मुळे शेतकऱ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. पुण्यातील नारीशक्ती महिला शेतकरी गटाने पाणीटंचाईवर मात करत नव्या पिढीला शेतीकडे वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

याशिवाय परभणीचे सहायक कृषी अधिकारी ध्रुपद विखे, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी लक्ष्मण पुस्ताडे आणि सहायक कृषी अधिकारी नोहान सोनावणे यांनीही आपल्या अनुभवांचे कथन केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ. आनंद बंग, विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, मुख्य कार्यपालन अधिकारी रीना दत्ता, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, एटीई चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पाणी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नामदेव ननावरे, कोइटा फाउंडेशनचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल भट्टड, सह-संस्थापक रिझवान कोइटा, व्यवस्थापकीय संचालक रेखा कोइटा, मायक्रोवेअर कॉम्प्युटिंग अँड कन्सल्टिंगचे संजय संगल तसेच टाटा मोटर्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुलकर्णी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.