मालाड येथील मनोहर वामन देसाई रुग्णालयाचा डॉ. विपिन शर्मा यांचा आढावा

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मालाड येथील मनोहर वामन देसाई रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतला व रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

Apr 20, 2026 - 23:41
 0  2
मालाड येथील मनोहर वामन देसाई रुग्णालयाचा डॉ. विपिन शर्मा यांचा आढावा
मनोहर वामन देसाई रुग्णालयाचा डॉ. विपिन शर्मा

मुंबई/प्रतिनिधी – बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी मालाड पूर्व येथील मनोहर वामन देसाई रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध सेवा व सुविधांचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान डॉ. शर्मा यांनी बाह्य रुग्ण विभाग (OPD), अतिदक्षता विभाग (ICU) तसेच इतर विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांच्याशी चर्चा करून रुग्णालयातील एकूण परिस्थितीची माहिती घेतली.

या दौऱ्यात त्यांच्या समवेत उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख डॉ. चंद्रकांत पवार उपस्थित होते. रुग्णालयातील यंत्रसामग्री, रुग्णवाहिका आणि इतर सुविधा याबाबत डॉ. शर्मा यांनी सविस्तर आढावा घेतला.

यावेळी डॉ. शर्मा यांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णांशी अधिक सौहार्दपूर्ण पद्धतीने संवाद साधण्याचे व योग्य समुपदेशन करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णालयातील स्वच्छता व सेवा सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

मनोहर वामन देसाई रुग्णालय हे मालाड पूर्व येथील महत्त्वाचे महापालिका रुग्णालय असून १८० खाटांची सुविधा असलेले हे रुग्णालय १९७६ पासून नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहे. रुग्णालयाची बाह्य रुग्ण नोंदणी कार्यालयीन दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत सुरू असते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.