दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे अभिवादन
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लोकभवनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुंबई | प्रतिनिधी : देवानंद शिंदे
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.
या प्रसंगी राज्यपालांनी दिवंगत अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण जागवली.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे यांच्यासह लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
लोकभवनात अत्यंत साध्या आणि शोकाकुल वातावरणात आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, त्यांच्या कार्याचा आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाचा यावेळी गौरव करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0