दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विधान भवनात अभिवादन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील विधान भवन येथे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Jul 22, 2026 - 19:17
Jul 22, 2026 - 19:55
 0  8
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विधान भवनात अभिवादन
अजितदादा पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री, विधान भवन, राहुल नार्वेकर,

मुंबई | प्रतिनिधी ,: देवानंद शिंदे 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

या अभिवादन कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, सचिव-4 शिवदर्शन साठ्ये, सहसचिव राजेश तारवी, उपसचिव विजय कोमटवार (संचालक, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र) तसेच जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान आणि राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याची आठवण उपस्थितांनी कृतज्ञतेने व्यक्त केली.

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, त्यांच्या कार्याचा आणि लोकसेवेतील योगदानाचा गौरव करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1