मुंबईत ३.८८ कोटींच्या ‘चरस’सह एक जण गजाआड; अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने चेंबूर परिसरात कारवाई करत ३ किलो ८८६ ग्रॅम ‘चरस’ जप्त केले. सुमारे ३ कोटी ८८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

May 22, 2026 - 17:54
 0  7
मुंबईत ३.८८ कोटींच्या ‘चरस’सह एक जण गजाआड; अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई
मुंबई चरस जप्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई गुन्हे शाखा, चेंबूर

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. २२ : बृहन्मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटने मोठी कारवाई करत चेंबूर परिसरातून सुमारे ३ कोटी ८८ लाख ६० हजार रुपयांच्या ‘चरस’ अंमली पदार्थासह एका संशयिताला अटक केली आहे.

या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट येथे गुन्हा क्रमांक ५२/२०२६ नोंद करण्यात आला असून एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८ (क) आणि २० (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टिळकनगर पोलीस ठाण्यातही संबंधित गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक मुंबई शहरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री, साठवण आणि पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत होते.

दरम्यान, २१ मे २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस फ्लायओव्हरखालील रेल व्ह्यू सीएचएस रोड परिसरात एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत पंचांसमक्ष झडती घेतली.

झडतीदरम्यान संशयिताकडून ३ किलो ८८६ ग्रॅम वजनाचा ‘चरस’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत ३ कोटी ८८ लाख ६० हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यानंतर संबंधित संशयिताविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बृहन्मुंबई पोलीस दलाने ‘अंमली पदार्थमुक्त समाज’ निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण वाघ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण वाघ करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0