महामहिम प्रिन्स रहीम आगा खान यांचे मुंबईत स्वागत
महामहिम प्रिन्स रहीम आगा खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
मुंबई ब्यूरो : अनिल सावरे
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
मुंबई, दि. १२ : महामहिम प्रिन्स रहीम आगा खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सचिव डॉ. राजेश गवांडे, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
विमानतळावर स्वागताचा औपचारिक कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रिन्स रहीम आगा खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पुढील नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण केले.
राजशिष्टाचाराच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुंबई आगमनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक व्यवस्था केली होती.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0