रामतीर्थ निरंजन मठात श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा पट्टाभिषेक सोहळा २७ जून रोजी

रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान होणारे श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा भव्य पट्टाभिषेक (चादर विधी) सोहळा २७ जून रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. विविध मठांचे साधू-महंत, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.

Jun 24, 2026 - 16:43
 0  89
रामतीर्थ निरंजन मठात श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा पट्टाभिषेक सोहळा २७ जून रोजी
श्री नृसिंह कृपादासजी महाराज, पट्टाभिषेक सोहळा, चादर विधी

नाशिक ब्यूरो: सद्गुरू कृपेने रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान होणारे श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा (चादर विधी) शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी अभिजित मुहूर्तावर संपन्न होणार आहे.

स्वागत समितीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. महंत श्री भक्तीचरणदासजी महाराज तसेच विरक्त साधू समाज नाशिक मंडळ यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यास धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध मठांचे साधू, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ ते १२ या वेळेत पट्टाभिषेक (चादर विधी) सोहळ्याने होईल. त्यानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत साधुसंत व महंतांचा सत्कार, सन्मान आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रामतीर्थ निरंजन मठ, ७८९, उमा महेश्वर लेन, एकमुखी दत्त मंदिराजवळ, रविवार पेठ, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय सायंकाळी ६.३० वाजता ३१ गोदासेवकांच्या हस्ते गोदा महाआरती आणि प्रसाद वितरणाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक आणि ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविक, श्रद्धाळू, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, वैदिक ज्ञान-विज्ञान संस्कृत महाविद्यालय (गुरुकुल) वेद पाठशाळेचे अध्यक्ष मदन देवी आणि स्मार्त चुडामणी शांताराम शास्त्री भानोसे गुरुजी यांनी केले आहे.

रामतीर्थ निरंजन मठाच्या परंपरेतील हा महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळा असून यामुळे अध्यात्म, संस्कृती आणि धार्मिक परंपरांचा गौरव अधिक वृद्धिंगत होणार असल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0