छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात; १५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांतून १५,१४८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

Aug 2, 2026 - 18:37
 0  13
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात; १५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर, कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ,

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : उमेश जाधव

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील एकूण १५ हजार १४८ लाभार्थ्यांना देण्यात आला.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील महसूल विभागामार्फत या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने या उपक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनपर भाषणानंतर निवडक लाभार्थ्यांना सन्मानपत्रे आणि विविध योजनांअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठ्या

संख्येने लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक होते. विशेष उपस्थिती म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत, जिल्हाधिकारी विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले तसेच करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार उपस्थित होते.

यावेळी महसूल विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून शिबिर यशस्वीपणे पार पाडले.

विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या या महसूल समाधान शिबिरामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन उपयुक्त ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.