पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन काळाची गरज – सुनील केदार यांचे वक्तव्य
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर ही काळाची गरज असल्याचे मत भाजप नेते सुनील केदार यांनी व्यक्त केले. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळावर टीका करत भाजप सरकार स्थापनेचे स्वागत करण्यात आले. नाशिकमध्ये यानिमित्त जल्लोष साजरा करण्यात आला.
नाशिक ब्यूरो
नाशिक : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी सत्ता परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सत्ताकाळात राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला होता. भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि सर्वसामान्यांवरील अन्याय वाढल्याचा आरोप त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर राज्यात भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन होणे हा जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, बोगस मतदारांची नावे वगळण्यात आल्यामुळे राज्यातील परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
या विजयाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि कार्यकर्त्यांमध्ये पेढे वाटण्यात आले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौर आडके-आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगर सरचिटणीस सुनील देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0