तुकोबारायांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा सेवाभावी उपक्रम

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विश्व हिंदू परिषद-बजरंग दल, पिंपरी-चिंचवड जिल्ह्याच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी छत्री, रेनकोट, फराळ, पाणी आणि बाल वारकऱ्यांना फुग्यांचे वाटप करण्यात आले.

Jul 13, 2026 - 19:19
 0  13
तुकोबारायांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा सेवाभावी उपक्रम
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, संत तुकाराम महाराज पालखी

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, पिंपरी-चिंचवड जिल्ह्याच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात वारकरी बांधवांचे भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांसाठी छत्री, रेनकोट, फराळ आणि पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच बाल वारकऱ्यांना फुगे देऊन त्यांच्या आनंदात भर घालण्यात आली.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे फुलांची उधळण करून तसेच प्रभू श्रीराम, ज्ञानोबा-तुकोबांच्या नामगजरात स्वागत करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला वारकरी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र धर्मयात्रा प्रमुख संजय मुद्राळे आणि प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले.

या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, पिंपरी-चिंचवड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले असून, पुणे ग्रामीण विभाग मंत्री धनंजय उत्तम गावडे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला. वारकरी सेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक परंपरेला हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.