कामगारनेते यशवंतभाऊ भोसले पाच जिल्ह्यांच्या तीन दिवसीय कामगार संपर्क दौऱ्यावर; कर्मचारी व कामगारांशी साधणार थेट संवाद

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले २७ ते २९ जून २०२६ दरम्यान पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या तीन दिवसीय कामगार संपर्क दौऱ्यावर राहणार आहेत. विविध औद्योगिक क्षेत्रांतील कर्मचारी, कामगार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

Jun 27, 2026 - 03:27
 0  2
कामगारनेते यशवंतभाऊ भोसले पाच जिल्ह्यांच्या तीन दिवसीय कामगार संपर्क दौऱ्यावर; कर्मचारी व कामगारांशी साधणार थेट संवाद
यशवंतभाऊ भोसले, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, कामगार संपर्क दौरा,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २६ : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले हे शनिवार, दि. २७ जून ते सोमवार, दि. २९ जून २०२६ या कालावधीत पाच जिल्ह्यांच्या तीन दिवसीय राज्यव्यापी कर्मचारी व कामगार संपर्क दौऱ्यावर असणार आहेत. दौंड, कुरकुंभ एमआयडीसी, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे विविध बैठका, कर्मचारी मेळावे आणि पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार या दौऱ्याद्वारे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील अन्यायग्रस्त कामगार, कंत्राटी कर्मचारी, कायम कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.

दौऱ्याची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे :

शनिवार, दि. २७ जून

सकाळी ११.३० वाजता पिंपरी-चिंचवड येथून प्रस्थान.

दुपारी २.३० वाजता दौंड-कुरकुंभ एमआयडीसी येथे कामगार व व्यवस्थापन प्रतिनिधींची संयुक्त बैठक.

दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत कर्मचारी व कामगार संपर्क मेळावा आणि संवाद.

सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान व रात्री मुक्काम.

रविवार, दि. २८ जून

सकाळी १० वाजता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सभागृह, सोलापूर येथे कार्यकारिणी बैठक व कर्मचारी मेळावा.

दुपारी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन.

त्यानंतर देवस्थानातील कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत कर्मचारी प्रश्नांवर बैठक.

टाटा इन्स्टिट्यूट, तुळजापूर येथे कर्मचारी समितीसोबत चर्चा.

सायंकाळी लातूर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचारी कार्यकारिणी समितीची बैठक.

त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान.

सोमवार, दि. २९ जून

सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालय खंडपीठात विधीतज्ज्ञ आणि अधिवक्त्यांसोबत बैठक.

दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद.

सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत सिडको येथील ललित कला भवन येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सभासदांचा भव्य कर्मचारी मेळावा.

रात्री पुण्याकडे प्रस्थान.

या दौऱ्यात यशवंतभाऊ भोसले विविध औद्योगिक क्षेत्रांतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेणार असून, कायदेशीर मार्गदर्शन, संघटनात्मक भूमिका आणि न्यायालयीन बाबींवर सविस्तर चर्चा करणार आहेत. कर्मचारी आणि कामगारांना त्यांच्या समस्या थेट मांडण्याची तसेच योग्य मार्गदर्शन मिळविण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीने म्हटले आहे.

संघटित व असंघटित क्षेत्रातील अन्यायग्रस्त कर्मचारी, कामगार आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0