लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राजधानीत अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा परिचय करून देण्यात आला.

Aug 1, 2026 - 22:29
Aug 22, 2026 - 18:42
 0  6
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राजधानीत अभिवादन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठे जयंती, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

नवी दिल्ली, दि. १ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते तसेच महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाचा, शाहिरीचा आणि सामाजिक कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून व शाहिरीतून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि त्यांच्या साहित्य व सामाजिक कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.