महाराष्ट्र दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर; विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल व डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार, ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार असून डिजिलॉकरमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

May 8, 2026 - 02:14
May 8, 2026 - 02:20
 0  9
महाराष्ट्र दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर; विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल व डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध
दहावी निकाल 2026, महाराष्ट्र एसएससी निकाल

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार, दि. ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक निकालाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

दहावी परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन उपलब्ध होणार आहे :

results.digilocker.gov.in⁠�

mahahsscboard.in⁠�

sscresult.mkcl.org⁠�

results.targetpublications.org⁠�

results.navneet.com⁠�

tv9marathi.com⁠�

Indian Express Education Result Page⁠�

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील तसेच सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येणार आहे. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच mahahsscboard.in (School Login)⁠� या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल पाहता येणार आहे.

गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थी स्वतः किंवा संबंधित शाळांमार्फत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी आवश्यक अटी, शर्ती आणि सूचना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ संकेतस्थळ⁠� वर उपलब्ध असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0