मंत्री बावनकुळे व रावल यांच्याकडून डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
माजी राज्यपाल व ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कोल्हापुरातील यशवंत निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २३ (जिमाका) : माजी राज्यपाल तथा ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी मंत्री बावनकुळे आणि मंत्री रावल यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. डॉ. पाटील यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील कार्याचा आणि त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा त्यांनी यावेळी स्मरण केला.
भेटीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांचे पुत्र डॉ. संजय पाटील तसेच माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीयांशी संवाद साधून दुःख व्यक्त केले. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे, आमदार शिवाजी पाटील, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील तसेच महानगरपालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर आदी उपस्थित होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत उपस्थित मान्यवरांनी पाटील कुटुंबीयांना धीर दिला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0