पिंपरीत शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेनेतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा

पिंपरी येथे शिवशाही व्यापारी संघ, हिंदू मातंग सेना आणि पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्थापना दिवस आणि जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन, कामगारांचा सन्मान आणि सामाजिक न्यायाच्या मागण्या करण्यात आल्या.

May 1, 2026 - 20:39
 0  12
पिंपरीत शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेनेतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र दिन, कामगार दिन, शिवशाही व्यापारी संघ, हिंदू मातंग सेना, अण्णाभाऊ साठे,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १ मे २०२६: शिवशाही व्यापारी संघ, हिंदू मातंग सेना आणि पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्थापना दिवस व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना तसेच कामगार चळवळीतील सर्व श्रमिक, कष्टकरी बांधवांना अभिवादन करण्यात आले.

युवराज दाखले यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र निर्मितीसाठी हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचा गौरव करत मातंग समाजासह सर्व वंचित, शोषित आणि कामगार बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक हक्कांसाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अ, ब, क, ड वर्गीकरण निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली.

कार्यक्रमादरम्यान रिक्षाचालक, हमाल, बांधकाम मजूर, सफाई कामगार, घरेलू कामगार आणि छोटे व्यापारी बांधवांना लाडू वाटप करण्यात आले. “जय महाराष्ट्र”, “जय कामगार” आणि “कामगार एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यावेळी प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दिल्ली येथे फाऊंडेशन स्थापन करण्याची मागणी केली.

कार्यक्रमास संदिपान झोंबाडे, अरुण जोगदंड, युवराज दाखले, प्रा. डॉ. धनंजय भिसे, संजय धुतडमल, सचिन दोनगहू, मंगेश डाखोरे, सोपान चव्हाण, विशाल कसबे, गुलाबराव गरूड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.