शिक्षण संवाद २०२६ : शिक्षकांच्या अनुभवांना सर्वोच्च प्राधान्य; सकारात्मक सूचनांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

शिक्षण संवाद २०२६, शिक्षण संवाद, दादाजी भुसे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र शिक्षण विभाग, शालेय शिक्षण, शिक्षक, शिक्षकांचे अनुभव, शिक्षण सुधारणा, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, महाराष्ट्र शासन, शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवन, शिक्षण धोरण, शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन अध्यापन, योग आणि अध्यात्म, सैनिकी शिक्षण, आत्मरक्षा अभियान, शासकीय शैक्षणिक योजना, शिक्षण परिषद, Maharashtra Education News, School Education Maharashtra, Education Dialogue 2026, Mi Marathi Live News

Jul 22, 2026 - 23:54
 0  7
शिक्षण संवाद २०२६ : शिक्षकांच्या अनुभवांना सर्वोच्च प्राधान्य; सकारात्मक सूचनांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी – शिक्षणमंत्री दादाजी भुसे
शिक्षण संवाद २०२६, शिक्षण संवाद, दादाजी भुसे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र शिक्षण विभाग,

मुंबई | ब्यूरो: अनिल सावरे 

राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुंबईतील चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन येथे आयोजित 'शिक्षण संवाद २०२६' या विचारमंथन सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या संचालक नीता पाटील, राज्यभरातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांचा अनुभवच शिक्षण व्यवस्थेचा पाया

यावेळी बोलताना शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, वर्गखोलीत विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष काम करणाऱ्या शिक्षकांचा अनुभव हा शिक्षण विभागासाठी सर्वात महत्त्वाचा मार्गदर्शक आहे. शिक्षकांनी मांडलेल्या अडचणी, सूचना आणि अनुभवांच्या आधारे भविष्यातील शैक्षणिक धोरणे अधिक सक्षम, परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यात येतील.

ते पुढे म्हणाले की, शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून सुसंस्कारित, जबाबदार आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्याचे प्रभावी साधन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्ये रुजविण्याची गरज अधोरेखित केली.

शिक्षण क्षेत्रातील बदलांसाठी शासन कटिबद्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

विचारमंथनातून प्राप्त होणाऱ्या सर्व सकारात्मक सूचना आणि शिफारशींचा गांभीर्याने विचार करून त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल. शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख करण्याचा शिक्षण विभागाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवसभर विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

'शिक्षण संवाद २०२६' अंतर्गत दिवसभर विविध शैक्षणिक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.

'अध्ययन-अध्यापनातील प्रयोग आणि शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन' या विषयावर उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे आणि सचिन उषा विलास जोशी यांनी मार्गदर्शन केले.

'शालेय स्तरावर योग आणि अध्यात्म' या सत्रात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज झगरे, पल्लवी आचार्य काटेकर आणि पद्मश्री उदय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग आणि संस्कारांचे महत्त्व विशद केले.

'शालेय स्तरावर सैनिकी शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी' या विषयावर सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल सतेश देवानराव हंगे (नि.) आणि एअर व्हेटरन विंग कमांडर एम. याग्नारामन यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम विकसित करण्यासाठी सैनिकी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.

'शालेय स्तरावर कला, क्रीडा आणि अभिनय उपक्रम' या विषयावर प्रसिद्ध लेखक संजय कळमकर आणि बालनाट्यकार राजीव तुलालवार यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात कला आणि क्रीडा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

याशिवाय 'राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी' या विषयावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोलीकर यांनी मार्गदर्शन केले. तर 'शासकीय योजना : सद्यस्थिती, आव्हाने व संधी' या सत्रात उपसंचालक (योजना) डॉ. वंदना वाहूळ आणि संजय डोलीकर यांनी विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी, त्यातील आव्हाने आणि भविष्यातील संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.

शिक्षकांच्या सहभागातून शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा

या विचारमंथन सोहळ्यात शिक्षकांनी शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्न, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सुधारणा याविषयी मते मांडली. शिक्षकांच्या अनुभवांच्या आधारे शैक्षणिक धोरणांमध्ये आवश्यक बदल करून राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक प्रभावी, आधुनिक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलणार असल्याचा विश्वास शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0