४ मे २०२६ निकाल: भाजपचा ऐतिहासिक विजय; मुंबईत जल्लोषात विजयोत्सव
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीतील निवडणूक निकालात भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा मुख्यालयात उत्साहात विजयोत्सव पार पडला.
मुंबई, दि. ०४ मे २०२६ : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निकालांद्वारे देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख आणि दूरदर्शी नेतृत्वावर तसेच भाजपच्या राष्ट्रहिताच्या विचारधारेवर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
हा जनादेश विकास, स्थैर्य आणि सुशासनाच्या बाजूने दिलेला स्पष्ट कौल असल्याचे भाजपा नेत्यांनी यावेळी नमूद केले.
या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयात विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते.
या सोहळ्यात मुंबई महापौर रितू तावडे, मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, माजी आमदार सुनील राणे, माधवी नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक, मुख्य प्रवक्ता नवनाथ बन, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह अनेक मान्यवर, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटप आणि घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला. या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचा सन्मान असल्याचे सांगत आगामी काळात अधिक जोमाने जनसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0