भाजपमध्ये पक्ष संघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही – अ‍ॅड. भरतजी पाटील

भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त शहर प्रभारी अ‍ॅड. भरतजी पाटील यांनी मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित संघटनात्मक आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटना ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असल्याचे सांगितले.

May 13, 2026 - 16:57
 0  3
भाजपमध्ये पक्ष संघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही – अ‍ॅड. भरतजी पाटील
भाजप बैठक, भरतजी पाटील, पिंपरी चिंचवड भाजपा, शत्रुघ्न काटे

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड :

“राजकारणात काम करत असताना पक्ष संघटना ही नेहमी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असते. प्रत्येक कार्यकर्त्याने ही भावना मनाशी पक्की बाळगली पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षात संघटनेपेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीही नाही,” असे ठाम प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त शहर प्रभारी अ‍ॅड. श्री भरतजी पाटील यांनी केले.

मोरवाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पिंपरी-चिंचवड शहराच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अ‍ॅड. भरतजी पाटील यांची प्रभारीपदी नियुक्ती केल्यानंतर आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, दिनेश यादव यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी, विविध मोर्चे, आघाड्या, सेल, प्रकोष्ठ तसेच मंडल अध्यक्ष आणि सरचिटणीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत अ‍ॅड. भरतजी पाटील यांनी शहरातील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकटीकरण, बूथ स्तरावरील संघटन मजबुती आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर विशेष भर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि आमदार अमित गोरखे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जनसेवेचे व्रत घेतले आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासोबतच सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षाची ध्येयधोरणे घराघरांत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कार्यकर्त्यांचे कष्ट आणि जनतेचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून आगामी काळात पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यावर आमचा भर असेल.”

मोरवाडी येथील शहर भाजपा मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या तयारीला या निमित्ताने वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0