राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठशिल्प प्रदर्शनाला दिली भेट

राज्यपाल Jishnu Dev Varma यांनी मुंबईतील दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठशिल्प प्रदर्शनाला भेट देत कलाकारांचे कौतुक केले. पद्मश्री Shankar Baba Papalkar यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या कलाकृतींना विशेष दाद मिळाली.

May 18, 2026 - 23:23
 0  2
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठशिल्प प्रदर्शनाला दिली भेट
जिष्णू देव वर्मा, राज्यपाल महाराष्ट्र, शंकरबाबा पापळकर

मुंबई, दि. १८ :  जिष्णू  देव वर्मा  यांनी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठशिल्प कलाकृती प्रदर्शनाला भेट देऊन कलाकारांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींचे अवलोकन केले.

हे प्रदर्शन पद्मश्री शंकर बाबा पापळकर  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. राज्यपालांनी प्रदर्शनातील कलाकारांशी संवाद साधत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. तसेच शंकरबाबा पापळकर यांनी दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी केलेल्या सामाजिक कार्याचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी शंकरबाबा पापळकर यांनी राज्यपालांना विविध काष्ठशिल्पांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली. या प्रदर्शनामध्ये स्व. अंबादास पंत वैद्य बेवारस दिव्यांग बालगृह, वझ्झर, जिल्हा अमरावती येथील मुलांनी सागवान, बेल आदी लाकडांपासून साकारलेल्या आकर्षक काष्ठशिल्पांचा समावेश होता. या कलाकृती विक्रीसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमात पु. ल. देशपांडे अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कलादालनाच्या क्युरेटर वर्षा कारळे तसेच छायाचित्रकार शिरीष कारळे उपस्थित होते.

दिव्यांग आणि अनाथ मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0