त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमधील भ्रष्टाचार व गैरकारभाराला आवर घालावा; माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची मागणी

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमधील कथित भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि भाविकांशी होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करण्याची मागणीही त्यांनी केली.

Jun 1, 2026 - 22:16
 0  66
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमधील भ्रष्टाचार व गैरकारभाराला आवर घालावा; माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची मागणी
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ललिता शिंदे, त्र्यंबकेश्वर मंदिर

नाशिक ब्युरो : त्र्यंबकेश्वर मंदिर हे हिंदुस्थानातील प्रमुख धर्मपीठांपैकी एक असून येथे वर्षभर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, मंदिर प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संस्थेच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि भाविकांशी गैरवर्तन होत असल्याचा आरोप केला आहे.

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ललिता शिंदे म्हणाल्या की, त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र गाभाऱ्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांना काही क्षणही शांतपणे दर्शन घेण्याची संधी दिली जात नाही. मंदिरातील काही कर्मचारी भाविकांना धक्काबुक्की करतात, खांद्याला धरून पुढे ढकलतात, असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा विचार करण्यात यावा. यासाठी ट्रस्ट, पुजारी आणि संबंधित घटकांसोबत बैठक घेऊन दोन टप्प्यांमध्ये सेवा देण्याची व्यवस्था करता येऊ शकते, असे त्यांनी सुचविले.

शिंदे यांनी आरोप केला की, देवस्थान ट्रस्टचे लक्ष भाविकांना सुविधा देण्यापेक्षा उत्पन्न वाढविण्यावर अधिक केंद्रित आहे. २०० रुपयांच्या पेड दर्शन व्यवस्थेवरही त्यांनी आक्षेप घेतला असून यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

आगामी कुंभमेळा लक्षात घेता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल, धक्काबुक्की आणि गैरसोयी थांबविण्यासाठी ट्रस्टने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या, आर्थिक व्यवहार आणि कारभाराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

त्र्यंबकेश्वर देवस्थानातील कथित गैरकारभारासंदर्भात सविस्तर निवेदन Bombay High Court चे मुख्य न्यायमूर्ती, जिल्हा न्यायाधीश नाशिक, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि नाशिक जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.