लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त मुंबईत अभिवादन; महापौर रितू तावडे यांनी अर्पण केला पुष्पहार

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त मुंबई महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका मुख्यालय आणि स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Jul 23, 2026 - 18:01
 0  5
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त मुंबईत अभिवादन; महापौर रितू तावडे यांनी अर्पण केला पुष्पहार
लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक जयंती,

मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गुरुवारी (२३ जुलै) महानगरपालिका मुख्यालयातील लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, महानगरपालिका उपसचिव प्रियांका देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

स्वराज्यभूमी येथेही वाहिली आदरांजली

त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे लोकमान्य टिळक यांच्या समाधीस्थळी जाऊन अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

या कार्यक्रमास लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सिलम, लोकमान्य टिळक यांच्या पणती व समितीच्या सहसचिव डॉ. उज्ज्वला मेहंदळे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अध्यक्ष व लोकमान्य टिळक यांचे खापरपणतू डॉ. रोहित दीपक टिळक, स्थानिक नगरसेविका स्नेहल तेंडुलकर, गौरव तेंडुलकर, समितीचे खजिनदार संतोष गाजुल, उपआयुक्त विनायक विसपुते, डी विभागाचे सहायक आयुक्त संतोष साळुंखे, महानगरपालिका उपसचिव सोनल मांजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महापौरांचा सत्कार

कार्यक्रमादरम्यान नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांनी महापौर रितू तावडे यांना पारंपरिक पगडी प्रदान करून सन्मानित केले. तसेच डॉ. रोहित टिळक यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव केला.

लोकमान्य टिळक यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या राष्ट्रसेवेच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. त्यांच्या स्वराज्य, राष्ट्रप्रेम आणि लोकजागृतीच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0