राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा सखोल आढावा

पुणे महानगरपालिकेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन, अमृत योजना, पाणीपुरवठा, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, नव्याने समाविष्ट गावांतील सुविधा आणि पावसाळ्यापूर्व तयारीवर भर देण्यात आला.

Apr 28, 2026 - 04:09
Apr 28, 2026 - 04:23
 0  2
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा सखोल आढावा
पुणे महानगरपालिका बातमी, माधुरी मिसाळ पुणे

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे

पुणे महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महानगरपालिकेत विविध विकास प्रकल्पांबाबत सखोल आढावा बैठक पार पडली. शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, अमृत योजना, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा, मलनिःसारण प्रकल्प, पाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास, प्रधानमंत्री आवास योजना, श्रम साफल्य योजना, पाणीपुरवठा योजना, पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्ती व नाला सफाई, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आराखडा आणि घनकचरा व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यात आला.

तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरी सुविधा जसे रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था तसेच शाळा व रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि दर्जा सुधारणा यावरही विशेष चर्चा करण्यात आली.

शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवणे, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी वेळेत पूर्ण करणे यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

पुणेकरांना सक्षम पायाभूत सुविधा, सुयोग्य नियोजन, स्वच्छ व सुंदर शहर तसेच आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या आणि आगामी विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विकासकामांना अधिक वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीच्या प्रारंभी महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे स्वागत केले.

या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते निलेश निकम, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या पक्षनेत्या हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षनेते सोपान चव्हाण, शिवसेना उ.बा.ठा.चे पक्षनेते नितीन गावडे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त, खातेप्रमुख तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0