मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज आमंत्रित; ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची संधी
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रेची संधी उपलब्ध. १० मे २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
गडचिरोली, दि. ६ मे २०२६ : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील प्रमुख तीर्थस्थळांना भेट देऊन अध्यात्मिक समाधान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेत ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना राज्य व देशातील विविध तीर्थक्षेत्रांना मोफत प्रवास व दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
👉 पात्रता निकष:
लाभार्थ्याचे वय किमान ६० वर्षे असावे
वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त ₹२.५० लाख असावे किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक
शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रवासासाठी सक्षम असणे आवश्यक
संसर्गजन्य आजार नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक
👉 आवश्यक कागदपत्रे:
वयाचा पुरावा (जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / टीसी)
रेशन कार्ड / उत्पन्न प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र (किंवा पर्यायी कागदपत्रे)
वैद्यकीय प्रमाणपत्र
हमीपत्र
सन २०२६-२७ या कालावधीसाठी महाबोधी मंदिर येथे तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुकांनी १० मे २०२६ पर्यंत संपूर्ण माहिती (पत्ता, मोबाईल क्रमांक, वय) नमूद करून अर्ज सादर करावा.
ही यात्रा सुमारे २५ मे २०२६ दरम्यान चंद्रपूर रेल्वे स्थानक येथून रेल्वेद्वारे सुरू होणार आहे.
अधिक माहितीसाठी गडचिरोली येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मरावी यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
7
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2