नाशिकमध्ये ६ मे रोजी ‘कुंभ उद्योग संगम’ व डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट; मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ६ मे रोजी हॉटेल ताज येथे ‘कुंभ उद्योग संगम’ आणि डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

May 2, 2026 - 22:54
 0  6
नाशिकमध्ये ६ मे रोजी ‘कुंभ उद्योग संगम’ व डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट; मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार
नाशिक इन्व्हेस्टमेंट समिट, कुंभ उद्योग संगम

नाशिक ब्यूरो 

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ६ मे २०२६ रोजी ‘कुंभ उद्योग संगम’ तसेच ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’ आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम नाशिकमधील हॉटेल ताज येथे सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत होणार असल्याची माहिती उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.

उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले की, राज्यात उद्योगवाढ आणि गुंतवणूक वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये ही समिट आयोजित करण्यात आली आहे. आगामी कुंभमेळ्यात उद्योग आणि व्यावसायिकांचे योगदान महत्त्वाचे राहणार असून हरित नाशिक, स्वच्छ नाशिक यांसारख्या उपक्रमांना उद्योग क्षेत्राचे सहकार्य लाभणार आहे.

नाशिकमध्ये उत्तम पायाभूत सुविधा, महामार्ग, दळणवळण व्यवस्था आणि औद्योगिक संधी उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. या समिटच्या माध्यमातून नव्या सामंजस्य करारांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या परिषदेत उद्योग, गुंतवणूक, पर्यटन, रोजगारनिर्मिती, कुंभमेळा विकास, नागरी सुविधा आणि औद्योगिक संधी या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी उद्योग क्षेत्राशी सातत्याने संवाद सुरू असून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ही गुंतवणूक परिषद नाशिकसाठी ऐतिहासिक ठरणार असून भविष्यात नाशिक हे उद्योजक आणि गुंतवणूकदारांचे पसंतीचे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन बनेल.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.