एक दिवस शाळेसाठी' उपक्रमातून पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचे विद्यार्थ्यांमध्ये जनजागरण; ५०२ शाळांतील १.१३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या 'एक दिवस शाळेसाठी' या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा योग्य वापर आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत ५०२ शाळांमधील १ लाख १३ हजार १७१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Jul 17, 2026 - 04:20
 0  5
एक दिवस शाळेसाठी' उपक्रमातून पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचे विद्यार्थ्यांमध्ये जनजागरण; ५०२ शाळांतील १.१३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड पोलीस, वाहतूक शाखा, एक दिवस शाळेसाठी, रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, सायबर गुन्हे, सोशल मीडिया, विद्यार्थी जनजागृती,

पुणे प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड, दि. १६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेतर्फे राबविण्यात येणारा 'एक दिवस शाळेसाठी' हा जनजागृती उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरत आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, अपघात प्रतिबंध, व्यसनमुक्ती, सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

महिलांच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. वाहतूक शाखेच्या १४ पथकांमधील अधिकारी आणि अंमलदार निवडलेल्या १४ शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि विविध विषयांवर प्रबोधन करतात. 

१६ जुलै २०२६ रोजी या उपक्रमाच्या ३१व्या टप्प्यात, १४ शाळांमधील सुमारे ९,८५४ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पीपीटीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, अपघात टाळण्यासाठीची खबरदारी, अमली पदार्थ व व्यसनाधीनतेपासून दूर राहणे, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याविषयी माहिती देण्यात आली. 

या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, आतापर्यंत ३१ टप्प्यांत ५०२ शाळांना भेट देऊन एकूण १,१३,१७१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त, जबाबदार नागरिकत्व आणि सुरक्षित जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 

हा उपक्रम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. 

विद्यार्थ्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता, या जनजागृती मोहिमेचा पुढील टप्पा गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे. 

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0