सेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा राज्यस्तरीय सन्मान
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सेवा हक्क दिनी राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.
दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे “द्वितीय सेवा हक्क दिन” निमित्त आयोजित सोहळ्यात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते आणि राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे प्रमुख मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा राज्यस्तरीय कार्यक्रम सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
पीएमसी ३६० उपक्रमाची दखल
पुणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना अधिक गतिमान माहिती, सेवा आणि योजना उपलब्ध करून देण्यासाठी PMC 360 ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत खालील सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत:
संकेतस्थळ
सेवा पोर्टल
तक्रार निवारण प्रणाली
डीबीटी पोर्टल
ऑनलाइन पेमेंट सुविधा
ई-स्वाक्षरी (eSign)
QR Code प्रमाणीकरण
WhatsApp BOT
आपले सरकार पोर्टल
PMC Care इंटरफेस
नागरिकाभिमुख सेवांना चालना
मागील वर्षभरात या सर्व डिजिटल प्रणाली अद्ययावत करण्यात आल्यामुळे लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख झाली आहे.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कामगिरी
पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. या यशस्वी कामगिरीबद्दल राज्य सेवा हक्क आयोगाने पुणे महापालिकेचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0