महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘साहित्यरत्न दौड २०२६’; पिंपरी-चिंचवडमध्ये २,२०० हून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग
लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘साहित्यरत्न दौड २०२६’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २,२०० हून अधिक नागरिकांनी ‘रन फॉर हेल्थ’ उपक्रमात सहभाग नोंदवला.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड, दि. २ ऑगस्ट २०२६ : लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्यरत्न दौड २०२६’ला नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकात उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि जल्लोषमय वातावरणात पार पडलेल्या या दौडमध्ये २,२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात प्रथमच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अशा स्वरूपाची ‘साहित्यरत्न दौड’ आयोजित करण्यात आल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा झाली.
या दौडला पावसानेही साथ दिली. उत्साहाने भरलेल्या वातावरणात सहभागी नागरिकांनी ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला. कार्यक्रमादरम्यान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ढोल-ताशांचा आनंद घेत सहभागी नागरिकांचा उत्साह वाढविला.
‘साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत उपक्रम
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पिंपरी-चिंचवड प्रबोधन पर्व २०२६’ या साप्ताहिक कार्यक्रमांतर्गत ‘साहित्यरत्न दौड २०२६’ हा भव्य उपक्रम राबविण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन, आर्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि कलारंग यांच्या संयुक्त सहकार्याने या आगळ्यावेगळ्या दौडचे आयोजन करण्यात आले होते.
विचारांचा जागर, उत्साहाचा सागर
आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या दौडमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवडसह विविध शहरांतून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे बर्ड व्हॅली उद्यान परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत नागरिकांनी आरोग्य, सामाजिक समरसता आणि सकारात्मकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. ही दौड केवळ क्रीडा उपक्रम न राहता सामाजिक प्रबोधन आणि युवकांच्या सहभागाचा उत्सव ठरली.
‘रन फॉर हेल्थ’ ही स्तुत्य संकल्पना – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल आमदार अमित गोरखे यांचे विशेष अभिनंदन केले.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, “महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध बोधपर्व, व्याख्याने आणि मिरवणुका आयोजित केल्या जातात. मात्र, शहर सुदृढ राहावे आणि नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, या उदात्त उद्देशाने आमदार अमित गोरखे यांनी ‘साहित्यरत्न दौड – रन फॉर हेल्थ’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे. हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असून, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.”
“आजच्या या ‘रन फॉर हेल्थ’ उपक्रमात २,२०० हून अधिक नागरिकांनी उत्तम क्रीडाभावनेने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो,” असेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शासनाच्या विविध उपक्रमांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याचे नमूद करत डॉ. सूर्यवंशी यांनी पोलीस प्रशासन, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
अण्णाभाऊंचे विचार आजही युवाशक्तीला प्रेरणा देतात – आमदार अमित गोरखे
आमदार अमित गोरखे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण बहुजन समाजासाठी आणि युवाशक्तीसाठी सदैव मार्गदर्शक आहेत. आजच्या ‘साहित्यरत्न दौड २०२६’मध्ये पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी आणि युवकांनी ज्या अभूतपूर्व उत्साहाने सहभाग घेतला, त्यावरून अण्णाभाऊंचे विचार आजही प्रत्येकाच्या मनात आणि रक्तात रुजलेले असल्याचे स्पष्ट होते.”
“युवकांना सकारात्मक ऊर्जा, उत्तम आरोग्य आणि सामाजिक समरसतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. यापुढेही अशाच प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक वारसा पुढे नेला जाईल,” असे आमदार गोरखे यांनी नमूद केले.
सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक
लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे अभिमानास्पद साहित्यरत्न तसेच सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते होते. आपल्या अजरामर साहित्य, प्रभावी शाहिरी आणि क्रांतिकारी कार्यातून त्यांनी वंचित, शोषित, कष्टकरी आणि बहुजन समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक न्यायाची प्रखर शिकवण दिली.
त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहेत. या वैचारिक वारशाला अभिवादन करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली ‘साहित्यरत्न दौड २०२६’ ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून सामाजिक समरसता, आरोग्यदायी जीवनशैली आणि युवकांच्या सशक्त सहभागाचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण सामाजिक उत्सव ठरला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, उमेश चांदगुडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, कला, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे सभापती कैलास कुटे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच नगरसेवक शीतल शिंदे, तुषार हिंगे, मंदार देशपांडे, कुशाग्र कदम, योगेश बहल, बापूशेठ घोलप, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सदाशिव खाडे, नेताजी शिंदे, गणेश लंगोटे, राजू दुर्गे, कुणाल लांडगे, युवराज लांडे, देवदत्त लांडे, सुजाता पलांडे, वैशाली खाडे, धरम वाघमारे, मंगेश घाडगे, अनिता वाळुंजकर, मयूर काळभोर, सतीश बाराहते आदी मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0