श्री अंबाबाई मंदिरातील विकासकामांचा अमित शाह यांच्या हस्ते शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीसांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन प्रकल्पाचा शुभारंभ 20 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Jun 20, 2026 - 02:06
 0  2
श्री अंबाबाई मंदिरातील विकासकामांचा अमित शाह यांच्या हस्ते शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीसांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
अमित शाह, अंबाबाई मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन प्रकल्पाचा शुभारंभ २० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत (दादा) पाटील, विजयकुमार गोरे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच राजेश क्षीरसागर यांच्यासह स्थानिक खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुढे मुख्यमंत्री फडणवीस इचलकरंजी येथे जाऊन कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक यांच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील. तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या नामविस्तार सोहळ्यातही उपस्थित राहतील.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0