बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पीडितेचा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्यास ६ महिन्यांची सक्तमजुरी; २०० रुपयांचा दंड
बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पीडितेचा व्हिडिओ बनवून तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने ६ महिन्यांची सक्तमजुरी आणि २०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
पुणे प्रतिनिधी | रोहन सोनाळे
पिंपरी, दि. ३१ जुलै २०२६ : बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका पीडितेचा व्हिडिओ बनवून तो इन्स्टाग्रामवर व्हायरल करत पीडितेची मानहानी केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आरोपीला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा तसेच २०० रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.
बावधन पोलिस ठाण्यात पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर क्रमांक २०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीने पीडितेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या कृत्यामुळे पीडितेची मानहानी झाल्याने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास बावधन पोलिस ठाण्याकडून करण्यात आला. प्राथमिक तपासात आरोपीने पीडितेची लैंगिक प्रताडना केल्याचेही निष्पन्न झाल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे संकलित करण्यात आले.
तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस निरीक्षक भास्कर कदम यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलम आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदींनुसार शिक्षा सुनावली.
न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा आणि २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त तीन दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
सदर प्रकरणाचा तपास बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलिस निरीक्षक भास्कर कदम आणि पोलिस निरीक्षक गुन्हे (रिटायर) यांनी तपासाची जबाबदारी पार पाडली. सरकारी अभियोक्ता म्हणून मा. अरुंधती बर्वे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी अशोक संकडे, शेरान कोटे आणि अंमलदार पोलीस शिपाई पांडुरंग पाडरे यांनी सहकार्य केले. बावधन पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0