मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनातही विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली.

May 28, 2026 - 18:43
May 28, 2026 - 18:43
 0  8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

नवी दिल्ली, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यानंतर कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमात व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0