डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड; शिवशाही व्यापारी संघाकडून सन्मान

शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि व्यापारी वर्गासाठी केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.

May 18, 2026 - 15:32
 0  7
डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड; शिवशाही व्यापारी संघाकडून सन्मान
शिवसेना नेत्या आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पुणे, दि. १८ :

शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले आणि शिवशक्ती-भीमशक्ती-लहुशक्ती समन्वय प्रमुख गुलाबराव गरूड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी युवराज दाखले म्हणाले की, “डॉ. नीलमताई गोऱ्हे या महाराष्ट्राच्या राजकारणातील झुंजार आणि लढाऊ महिला नेतृत्व आहे. सलग पाच वेळा बिनविरोध निवडून येणे हा त्यांच्या कार्याचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा मोठा पुरावा आहे. महिलांचे प्रश्न, कामगारांचे हक्क आणि व्यापारी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या विधानपरिषदेत नेहमीच आक्रमक भूमिका घेतात.”

ते पुढे म्हणाले की, “नीलमताई या केवळ शिवसेनेच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. विरोधकांनाही त्यांच्या विरोधात उमेदवार देता येत नाही, हीच त्यांची खरी ताकद आहे. शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.”

महिला सक्षमीकरण, बचत गट चळवळ, हुंडाबळी विरोधी कायदा तसेच व्यापारी महिलांच्या हक्कांसाठी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचेही युवराज दाखले यांनी नमूद केले. पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी आणि कामगार महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवशक्ती-भीमशक्ती-लहुशक्ती समन्वयक प्रमुख गुलाबराव गरूड, शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, सचिन जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0