राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत होरायझन अकॅडमीचा दिमाखदार विजय; वैष्णव बर्वे द्वितीय, वेदिका मानकर तृतीय

नाशिकच्या होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. वैष्णव बर्वे याने द्वितीय तर वेदिका मानकर हिने तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाचा गौरव वाढवला.

May 16, 2026 - 21:29
 0  19
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत होरायझन अकॅडमीचा दिमाखदार विजय; वैष्णव बर्वे द्वितीय, वेदिका मानकर तृतीय
होरायझन अकॅडमी, राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा, वैष्णव बर्वे, वेदिका मानकर,

नाशिक ब्यूरो 

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित होरायझन अकॅडमी, मखमलाबाद येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विद्यालयातील विद्यार्थी वैष्णव शेखर बर्वे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तर विद्यार्थिनी वेदिका विजय मानकर हिने दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आदेश पाटोळे, प्रतीक लोखंडे आणि वैशाली मतसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि मेहनतीमुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब शिरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, ग्रामीण विभाग संचालक रमेश आबा पिंगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्राचार्या भाग्यश्री लाडोळे तसेच विद्यार्थ्यांचे पालक विजय मानकर आणि शेखर बर्वे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी आयोजित सत्कार समारंभाला नगरसेवक वाळू काकड आणि कल्पनाताई पिंगळे उपस्थित होते. नगरसेवक वाळू काकड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देत त्यांचा विशेष सत्कार केला आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश भागडे आणि निकिता पिंगळे यांनी केले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी यशस्वी खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0