केदारवस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तिमय सोहळा; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
पाथरी तालुक्यातील केदारवस्ती (गोपीनाथ नगर) येथे चंद्रशेखर बाबा मठ संस्थानच्या पुढाकाराने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडत असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मराठवाडा ब्युरो: लक्ष्मण चौरे
पाथरी – केदारवस्ती (गोपीनाथ नगर) येथे चंद्रशेखर बाबा मठ संस्थानच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.
या सप्ताहात ह.भ.प. कृष्ण महाराज बडे (भागवताचार्य), बालाजी महाराज तिडके (ज्ञानेश्वरी पारायण), गायनाचार्य गोविंद महाराज बडे, मृदुंगाचार्य अशोक चाटे तसेच बाबा चौरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहात त्यांच्या कीर्तन, प्रवचन आणि भजन-गायनामुळे भाविकांना अध्यात्मिक समाधान लाभत आहे. आज भागवत कथेचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सप्ताहादरम्यान दररोज हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
दरम्यान, श्री मंहतआप्पा महाराज चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाची ‘काल्याची सागता’ होणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या हरिनाम सप्ताहाची यंदा १२ वी वर्षपूर्ती होत असून या परंपरेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
चंद्रशेखर बाबा मठ संस्थान, चौंडी यांच्या या उपक्रमामुळे केदारवस्ती व परिसरात धार्मिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडत आहे. सप्ताहाच्या समारोपावेळी विशेष कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी बाबा चौरे, किरण केदार, राहुल तोंडे, वसंत महाराज चौरे, चंद्रशेन मुंडे यांच्यासह गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2