डिझेल चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस; पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनकडून खेड पोलिसांचा सत्कार

चांडोली (ता. खेड) येथील ट्रकमधील डिझेल चोरीचा गुन्हा सीसीटीव्हीच्या आधारे अल्पावधीत उघडकीस आणत आरोपीला अटक करणाऱ्या खेड पोलिसांचा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे राहण्याचे आवाहन केले.

Jun 29, 2026 - 01:31
 0  3
डिझेल चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस; पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनकडून खेड पोलिसांचा सत्कार
खेड पोलीस, डिझेल चोरी, पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशन,

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

"कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहिले पाहिजे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढविणे ही समाजाचीही जबाबदारी आहे," असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी केले.

चांडोली (ता. खेड, जि. पुणे) येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ज्ञानेश्वर मारुती मरगज यांच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून अल्पावधीत आरोपीला अटक केली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

हा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे आणि कार्याध्यक्ष दीपक कलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे, सचिव अरुण काळे, कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब घोमाल, इरफान पठाण, देवदत्त रावल तसेच इतर सभासद उपस्थित होते.

या गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद क्षीरसागर, पोलीस हवालदार संतोष घोलप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबदे, पोलीस हवालदार अतुल डेरे, पोलीस अंमलदार निलेश सुपेकर आणि स्वप्नील गाढवे यांनी तपासात तत्परता दाखवत आरोपीला जेरबंद केले.

यावेळी बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले की, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि बस वाहतूकदारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यापुढेही वेळोवेळी सन्मान करण्यात येईल.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0