महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कष्टकरी बांधवांचा सन्मान; लाडू व उपरणे देऊन गौरव
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कष्टकरी बांधवांना मानवंदना देत विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. श्रमिकांच्या परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
प्रतिनिधी रोहन सोनाळे
मुंबई, दि. १ मे : महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कष्टकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विशेष सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
रखरखत्या उन्हातही न थकता, न थांबता मेहनत करणाऱ्या श्रमिकांना मानवंदना देत हातगाडी ओढणारे कामगार, घरपोच गॅस सिलेंडर पोहोचवणारे गॅस कर्मचारी तसेच शाळांबाहेर उन्हात उभे राहून सुरक्षा करणारे सिक्युरिटी गार्ड यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी श्रमिक बांधवांना लाडू व उपरणे देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कष्टाच्या प्रत्येक थेंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आयोजकांनी कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले.
‘तुमच्या कष्टाचा आम्हाला अभिमान’
कार्यक्रमात बोलताना आयोजकांनी सांगितले की, समाजाची चाके सुरळीत फिरण्यासाठी कामगारांचे योगदान अनमोल आहे. आपल्या रोजच्या जीवनात श्रमिक वर्गाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या परिश्रमामुळेच विकास शक्य होत आहे.
आयोजकांची उपस्थिती
हा उपक्रम पीयूष शाह (साईनाथ मंडळ ट्रस्ट) आणि भाऊ थोरात (श्री शिवाजी मित्र मंडळ) यांच्या पुढाकारातून पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी “कामगार एकजुटीचा विजय असो”, “जय महाराष्ट्र, जय कामगार” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0