मराठा समन्वय परिषदेच्या नारीशक्ती प्रकोष्ठाची मध्यप्रदेश राज्य समीक्षा बैठक; नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

भोपाल येथे मराठा समन्वय परिषदेच्या नारीशक्ती प्रकोष्ठाची मध्यप्रदेश राज्य कार्य समीक्षा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत आगामी कार्ययोजनेवर चर्चा करण्यात आली तसेच महिला प्रकोष्ठाच्या विविध राष्ट्रीय, राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

Jun 30, 2026 - 00:19
 0  98
मराठा समन्वय परिषदेच्या नारीशक्ती प्रकोष्ठाची मध्यप्रदेश राज्य समीक्षा बैठक; नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
मराठा समन्वय परिषद, नारीशक्ती प्रकोष्ठ, भोपाल, मध्यप्रदेश,

भोपाल | प्रतिनिधी : मराठा समन्वय परिषदेच्या नारीशक्ती प्रकोष्ठाची मध्यप्रदेश राज्य कार्य समीक्षा बैठक रविवारी भोपाल येथे उत्साहात पार पडली. राज्यातील विविध जिल्हे आणि विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी नारीशक्ती प्रकोष्ठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा शर्मिला पाटील या होत्या. मध्यप्रदेश सांस्कृतिक कक्षाच्या अध्यक्षा पल्लवी जाधव यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली, तर रीना पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

बैठकीचे नियोजन आणि संयोजन भोपाल जिल्हाध्यक्ष प्रीती कनाठे, उपाध्यक्षा श्रद्धा मोहिते, जिल्हा सचिव कीर्ती दरवाई, शिक्षक प्रकोष्ठाचे संघटक नवीन वंजारी, परिषद संघटक गजानन फाटे आणि अनिल दरवाई यांनी केले.

नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

बैठकीत महिला प्रकोष्ठासाठी विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये रेखा जाधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्षा, अनुराधा पवार यांची मध्यप्रदेश प्रदेश कार्याध्यक्षा, अश्विनी चव्हाण आणि मीना शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षा, पल्लवी जाधव यांची सांस्कृतिक कक्ष अध्यक्षा, रोहिणी भोसले आणि रीना पवार यांची संभागीय अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय मंजुलता तापकीर (देवास जिल्हाध्यक्ष), वंदना निंबाळकर (देवास जिल्हा उपाध्यक्षा), प्रीती कनाठे (भोपाल जिल्हाध्यक्ष), श्रद्धा मोहिते (भोपाल जिल्हा उपाध्यक्षा), कीर्ती दरवाई (भोपाल जिल्हा सचिव), जयश्री मोहिते (सहसचिव) आणि कल्पना मोहिते (भोपाल शहर अध्यक्षा) यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

शिवचरित्र पुस्तिकेचे प्रकाशन

भोपालच्या जुन्या सुभाषनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ समाजसेवक डॉ. एन. एन. कनाठे तसेच मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी भोपाल जिल्हा कार्यसमितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील प्रमुख घटनांचा संक्षिप्त परिचय असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना शिवचरित्राचा अभ्यास सुलभ होईल, तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही ती उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र, स्वराज्य जनक परिवार प्रतिमा, 'शिवधर्म गाथा' आणि छत्रपती शिवाजी महाराजांची संक्षिप्त चरित्र पुस्तिका भेट देऊन सत्कार करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0