नांदुरी येथे 23 मे रोजी भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बुद्ध विहार लोकार्पण सोहळा

कळवण तालुक्यातील नांदुरी येथे 23 मे रोजी भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना आणि महाप्रज्ञा बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आयोजकांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

May 22, 2026 - 00:54
 0  4
नांदुरी येथे 23 मे रोजी भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बुद्ध विहार लोकार्पण सोहळा
नांदुरी बुद्ध विहार, बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना

नाशिक सप्तशृंगी गड ब्युरो | अमृत पवार

कळवण तालुक्यातील नांदुरी येथे शनिवार, दिनांक 23 मे 2026 रोजी भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना आणि महाप्रज्ञा बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आयु. सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर (महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, राष्ट्रीय अध्यक्ष – रिपब्लिकन सेना) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीनभाऊ अर्जुन पवार राहणार आहेत.

नांदुरी येथील समाजबांधव आणि युवकांनी पुढाकार घेत बुद्ध विहार उभारणीचे कार्य पूर्ण केले असून आज एक भव्य वास्तू उभी राहिली आहे. या नव्या वास्तूमध्ये बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करून महाप्रज्ञा बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

हा लोकार्पण सोहळा पूजनीय भिक्खू संघ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

भव्य मिरवणुकीचे आयोजन

कार्यक्रमानिमित्त 23 मे रोजी बौद्धवाडा परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून सकाळी साडेनऊ वाजता बुद्ध विहार परिसरात दाखल होणार आहे.

तसेच दुपारी 3 ते 6 वाजेदरम्यान भोजन व्यवस्था करण्यात आली असून सायंकाळी 6 वाजता बुद्ध विहार निर्मिती आणि विविध सामाजिक-धार्मिक कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहून क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन बुद्ध विहार संस्थान नांदुरी, भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदुरी, रमा माता महिला मंडळ, बौद्धवाडा परिसरातील युवक आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.