मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग; १२ जुलैपर्यंत विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत १२ जुलैपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ऑनलाइन नोंदणी शक्य नसलेल्या पात्र मतदारांनी BLO यांच्या मदतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

Jul 11, 2026 - 22:17
 0  3
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग; १२ जुलैपर्यंत विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन
SIR, मतदार यादी, विशेष सखोल पुनरीक्षण, नाशिक, BLO, Self Enumeration,

नाशिक | ब्यूरो 

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला नाशिक जिल्ह्यात वेग आला असून १२ जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन Self Enumeration प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसलेल्या पात्र मतदारांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मदतीने नोंदणी अर्ज भरावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

या विशेष शिबिरांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत १२४ नाशिक मध्यच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्पिता ठुबे, १२३ नाशिक पूर्वचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन हिरे, १२५ नाशिक पश्चिमच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे, १२६ नाशिकरोड-देवळालीच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शर्मिला भोसले, तहसीलदार माधुरी आंधळे आणि अपर तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते.

यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या मतदारसंघातील मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा आढावा देत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन नागरिकांकडून Self Enumeration प्रक्रिया पूर्ण करून घेत असल्याची माहिती दिली. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी व्यापक जनजागृतीही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाइन नोंदणी शक्य नसलेल्या मतदारांनी १२ जुलैपर्यंत संबंधित मतदान केंद्रावर भेट देऊन Enumeration Form भरावा. यावेळी मतदार ओळखपत्र (EPIC) तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले.

SIR मोहिमेचे महत्त्वाचे वेळापत्रक

३० जून ते २९ जुलै २०२६: घरोघरी जाऊन नोंदणी अर्जांचे वितरण

५ ऑगस्ट २०२६: प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन

५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी

५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६: दावे व हरकतींचा निपटारा

७ ऑक्टोबर २०२६: अंतिम मतदार यादीचे प्रकाशन

निवडणूक विभागाने सर्व पात्र मतदारांना या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.