लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही – मंत्री शंभूराज देसाई

शिवाजी विद्यापीठातील लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजाचा आढावा घेताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अध्यासनाच्या उपक्रमांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली. लोकनेते देसाई यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Jun 6, 2026 - 02:11
 0  3
लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही – मंत्री शंभूराज देसाई
शंभूराज देसाई, बाळासाहेब देसाई अध्यासन, शिवाजी विद्यापीठ

शिक्षण | कोल्हापूर | शासन

प्रतिनिधी | कोल्हापूर

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा; शिवाजी विद्यापीठाला मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

कोल्हापूर, दि. ५ : शिवाजी विद्यापीठातील लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजावरील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव तसेच मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते.

मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोल्हापुरात झाली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा परिचय नव्या पिढीला व्हावा यासाठी विद्यापीठाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २० महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा, व्याख्याने आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे.

समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश

ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांपर्यंत लोकनेते देसाई यांचे योगदान प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. युवकांना इतिहास आणि समाजकारणाची प्रेरणा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकनेते देसाई दालनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

यावेळी मंत्री देसाई यांनी विद्यापीठ प्रशासनाला ‘लोकनेते देसा

ई दालन’ उभारणीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच या दालनाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक पदनिर्मितीचा प्रस्तावही सादर करण्यास सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी अध्यासनाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत करून अध्यासनाच्या विविध उपक्रमांचा आणि कामगिरीचा सविस्तर आढावा सादर केला.

या बैठकीस डॉ. व्ही. जी. पानस्कर, डॉ. वैभव ढेरे, गजानन पळसे, डॉ. दत्तात्रय मचाले, अवधूत चव्हाण, डॉ. माया देसाई, डॉ. सोनल मंगल, संदीप केसरकर आणि डॉ. उमाकांत हत्तीकट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.