टेक वारी तालरंग’ कार्यक्रमात मंत्रालय दणाणले; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला सुरेल वाद्यांचा आनंद

मुंबईतील मंत्रालयात ‘टेक वारी 2.0’ अंतर्गत आयोजित ‘तालरंग’ कार्यक्रमात ढोलकी-संबळच्या ठेक्यांनी वातावरण रंगले. निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या सादरीकरणाने अधिकारी-कर्मचारी मंत्रमुग्ध झाले.

May 4, 2026 - 19:24
 0  1
टेक वारी तालरंग’ कार्यक्रमात मंत्रालय दणाणले; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला सुरेल वाद्यांचा आनंद
टेक वारी 2.0, तालरंग कार्यक्रम, मंत्रालय मुंबई

मुंबई, दि. ४: सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक वारी 2.0’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात ‘टेक वारी तालरंग’ या विशेष वाद्यवृंद कार्यक्रमाने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात ढोलकी आणि संबळच्या ठेक्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. प्रसिद्ध वादक निलेश परब (ढोलकी-संबळ) आणि कृष्णा मुसळे (ढोलकी) यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून कार्यक्रमाला रंगत आणली.

कार्यक्रमाची सुरुवात गणपती वंदनेने करण्यात आली. त्यानंतर ढोलकी, ढोल, संबळ आणि बासरीच्या साथीने गोंधळ गीत व कोळीगीत सादर करण्यात आले. या सादरीकरणामुळे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले.

कार्यक्रमाची सांगता निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या दमदार ढोलकी जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

या कार्यक्रमाला मंत्रालयातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0