जामीन मिळाल्यानंतर २० वर्षे फरार आरोपी चाकणमधून जेरबंद; विनोबा भावे नगर पोलिसांची कारवाई

मुंबईतील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तब्बल २० वर्षे फरार असलेल्या संतोष भिकन यादव याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील चाकणमधून ताब्यात घेतले.

Aug 2, 2026 - 17:06
 0  11
जामीन मिळाल्यानंतर २० वर्षे फरार आरोपी चाकणमधून जेरबंद; विनोबा भावे नगर पोलिसांची कारवाई
विनोबा भावे नगर पोलीस, २० वर्षे फरार आरोपी, चाकणमधून अटक,

मुंबई प्रतिनिधी : संतोष पांडे

मुंबई : मुंबईतील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तब्बल २० वर्षे फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी चाकणमधून ताब्यात घेतले. संतोष भिकन यादव असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा राठी, झारखंड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात सुमारे २० वर्षांपूर्वी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तत्कालीन भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३६६ आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात २००७ मध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला.

आरोपीचा अनेक वर्षे शोध घेण्यात आला. मात्र, तो सतत आपले नाव आणि ओळख लपवून विविध शहरांमध्ये काम करत फिरत असल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते.

दरम्यान, विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित ताड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील निगराणी पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. निगराणी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महादेव भिसे आणि पोलीस अंमलदार बाबा राठोड यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला.

या तपासात पोलीस हवालदार आव्हाड नाईक, प्रभाकर देवकर आणि अमर पाटील यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले. पोलिसांना आरोपी पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका झोपडपट्टी परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. यावेळी आरोपीचा ठावठिकाणा निश्चित झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तब्बल २० वर्षांनंतर फरार आरोपीला पकडण्यात विनोबा भावे नगर पोलिसांना यश आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित ताड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. निगराणी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महादेव भिसे आणि पोलीस अंमलदार आव्हाड नाईक, प्रभाकर देवकर, अमर पाटील व बाबा राठोड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.