देऊबाई कापसे उद्यानात बहुउद्देशीय विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन; सामाजिक संवादासाठी उपयुक्त ठरणार – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील देऊबाई कापसे उद्यानात बहुउद्देशीय दोन मजली विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे नागरिकांना व्यायाम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संवादासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

May 9, 2026 - 03:13
 0  2
देऊबाई कापसे उद्यानात बहुउद्देशीय विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन; सामाजिक संवादासाठी उपयुक्त ठरणार – महापौर रवि लांडगे
देऊबाई कापसे उद्यानात बहुउद्देशीय विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन;

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील उद्याने ही शहराचा श्वास असून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. उद्यानांमध्ये उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र येण्यासाठी, व्यायाम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संवादासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील देऊबाई कापसे उद्यान परिसरात बहुउद्देशीय दोन मजली विरंगुळा केंद्राच्या कामाचे भूमिपूजन आज महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य कुशाग्र कदम, तुषार हिंगे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांचे आधुनिकीकरण आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देऊबाई कापसे उद्यानात उभारण्यात येणाऱ्या दोन मजली विरंगुळा केंद्रासाठी सुमारे ६ लाख ५३ हजार रुपये खर्च अपेक्षित असून हे काम आठ महिन्यांत पूर्ण होणार आहे. हे केंद्र १८ मीटर बाय ८ मीटर अशा एकूण २८८ चौरस मीटर क्षेत्रफळात उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0