राज्यपालांच्या हस्ते तपती भौमिक मजूमदार यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार तपती भौमिक मजूमदार यांच्या “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या कला प्रदर्शनाचे जहांगीर कलादालन, मुंबई येथे उद्घाटन करण्यात आले.

May 13, 2026 - 19:48
 0  1
राज्यपालांच्या हस्ते तपती भौमिक मजूमदार यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
जिष्णु देव वर्मा, तपती भौमिक मजूमदार, भूमिजा बॉर्न ऑफ द अर्थ,

मुंबई, दि. १३ :

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते त्रिपुरा येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या “भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ” या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी जहांगीर कलादालन, मुंबई येथे करण्यात आले.

यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनातील कलाकृतींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत कलाकार तपती भौमिक मजूमदार यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला अभिनेत्री जयती भाटिया, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. मारुती शेळके, साध्वी मजूमदार तसेच कला प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे चित्र प्रदर्शन १८ मे २०२६ पर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0