कात्रज-कोंढवा विकास योजना रस्त्याच्या भूसंपादनाला गती; महापौर मंजुषा नागपुरे यांची पाहणी

कात्रज चौक ते पिसोळीपर्यंतच्या ५० मीटर विकास योजना रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली असून पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात सुमारे २५ हजार चौ. मी. क्षेत्र आले आहे. महापौर मंजुषा नागपुरे आणि आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

May 18, 2026 - 15:25
 0  6
कात्रज-कोंढवा विकास योजना रस्त्याच्या भूसंपादनाला गती; महापौर मंजुषा नागपुरे यांची पाहणी
कात्रज कोंढवा रस्ता, भूसंपादन, पुणे महानगरपालिका, मंजुषा नागपुरे,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पुणे, दि. १५ मे २०२६ :

कात्रज-कोंढवा परिसरातील विकास योजना रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात जागा आली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषाताई नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला.

मौजे कात्रज आणि मौजे कोंढवा येथील कात्रज चौक ते पिसोळीपर्यंत प्रस्तावित ८४ मीटर विकास योजना रस्त्यापैकी ५० मीटर विकास योजना रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही शासनामार्फत सुरू होती. या अंतर्गत सुमारे ४१ हजार चौ. मीटर क्षेत्राचा निवाडा विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक १५, पुणे यांच्या मार्फत २७ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या भूसंपादनासाठी पुणे महानगरपालिकेकडून शासनाकडे सुमारे १९७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर निवाडा आणि ताबा प्रक्रियेसंदर्भात पंधरा दिवसांची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार १४ मे २०२६ पासून प्रत्यक्ष ताबा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

१४ आणि १५ मे या दोन दिवसांत एकूण १०९ मिळकतींपैकी ४८ मिळकतींचा ताबा घेण्यात आला असून जवळपास २५ हजार चौ. मीटर क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आले आहे.

दरम्यान, NHAI मार्फत सुरू असलेल्या कात्रज उड्डाणपूलाच्या उतरणीसाठी आवश्यक जागाही आज ताब्यात घेण्यात आली असून त्या ठिकाणी पथ विभागामार्फत कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यावेळी आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभाग समिती अध्यक्षा रंजनाताई टिळेकर, नगरसेविका अर्चना जगताप, पूजाताई कदम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अजित बांबळे, भूसंपादन अधिकारी श्वेता दारुणकर तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.