स्वराज्यरक्षक’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना महापौर रितू तावडे यांचे अभिवादन
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. महापौर रितू तावडे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर संजय घाडी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर रितू तावडे यांनी ‘स्वराज्यरक्षक’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना रितू तावडे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे अतुलनीय शौर्य, अजोड त्याग आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांचा गौरव केला. शंभूराजांचा इतिहास प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असून स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान आणि त्यांचे तेजस्वी विचार आजही समाजसेवा तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी उपमहापौर संजय घाडी, महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0