एमसीजीएम सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती; अर्जाची मुदत 5 व 11 मे 2026

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एमसीएमसीआर केंद्रात विविध कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर झाली असून प्रमुख व फॅकल्टी पदांसाठी 5 मे तर अभियंता व कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी 11 मे 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Apr 29, 2026 - 01:02
 0  77
एमसीजीएम सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती; अर्जाची मुदत 5 व 11 मे 2026
MCGM भरती 2026, MCMCR recruitment, मुंबई महानगरपालिका नोकरी, सरकारी नोकरी मुंबई, इंजिनिअर भरती 2026,

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एमसीएमसीआर केंद्रात विविध कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर झाली असून प्रमुख व फॅकल्टी पदांसाठी 5 मे तर अभियंता व कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी 11 मे 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Description:

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपॅसिटी बिल्डिंग अँड रिसर्च (एमसीएमसीआर) मध्ये विविध कंत्राटी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती अंतर्गत सेंटर फॉर सिव्हिल अँड इन्फ्रा विभागासाठी प्रमुख (1 पद) आणि असोसिएट फॅकल्टी (1 पद), तसेच सेंटर फॉर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी असोसिएट फॅकल्टी (1 पद) पदे भरण्यात येणार आहेत. याशिवाय उप परिरक्षण अभियंता किंवा सहायक परिरक्षण अभियंता (1 पद) आणि कार्यालयीन सहाय्यक (2 पद) अशी एकूण पदे उपलब्ध आहेत.

प्रमुख आणि असोसिएट फॅकल्टी पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2026 आहे. तर उप परिरक्षण अभियंता आणि कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी 11 मे 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

ही सर्व पदे ‘नियमित कंत्राटी कर्मचारी’ स्वरूपाची असून कंत्राटाचा कालावधी तीन वर्षांचा राहणार आहे. उमेदवाराची कामगिरी समाधानकारक असल्यास त्याला पुढील मुदतवाढही दिली जाऊ शकते.

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://mcmcr.ac.in⁠� या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो भरावा आणि आवश्यक कागदपत्रांसह office@mcmcr.ac.in या ईमेल आयडीवर पाठवावा. पात्रता, अटी आणि इतर तपशील संकेतस्थळावरील ‘करिअर’ विभागात उपलब्ध आहेत.

एमसीएमसीआर ही महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिलेली राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था असून येथे विविध प्रशासकीय आणि तांत्रिक प्रशिक्षण उपक्रम राबविले जातात.

What's Your Reaction?

Like Like 6
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1