म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन; उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील म्हाडा मुख्यालयात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

May 1, 2026 - 18:27
 0  10
म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन; उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न
म्हाडा, महाराष्ट्र दिन, संजीव जयस्वाल, म्हाडा मुख्यालय, ध्वजवंदन,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. १ मे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उत्साहात ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.

यावेळी खेरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक तसेच म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताने राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य अभियंता महेश जेसवानी, सचिव प्रफुल ठाकूर, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विशाल राठोड, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

यावेळी संजीव जयस्वाल यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान म्हाडातील कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले.

म्हाडा मुख्यालय परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0