वेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी पायधुनी पोलिसांची धडक कारवाई; तीन आरोपी अटकेत

पायधुनी पोलिसांनी दिलेल्या स्टँड, मरीन बंडर आणि क्लार्क रोड परिसरात छापेमारी करून गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन महिला व एका पुरुषाला अटक केली. आरोपींकडून सुमारे ४२४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

Aug 4, 2026 - 22:19
 0  12
वेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी पायधुनी पोलिसांची धडक कारवाई; तीन आरोपी अटकेत
पायधुनी पोलीस, गांजा विक्री, अंमली पदार्थ कारवाई, मुंबई पोलीस, मरीन बंडर, क्लार्क रोड, दोन महिला अटक,

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

मुंबई, दि. ४ : वेकायदेशीरपणे गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात पायधुनी पोलिसांनी धडक कारवाई करत दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. मरीन बंडर आणि क्लार्क रोड परिसरात छापेमारी करून पोलिसांनी आरोपींकडून एकूण ४२४ ग्रॅम गांजा जप्त केला असून, जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत ३२ हजार ६०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पायधुनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी गस्ती दरम्यान ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिली स्टँड, मरीन बंडर परिसर तसेच क्लार्क रोड, रेल्वे पटरीजवळील भागात गांजा या अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून छापेमारी केली. कारवाईदरम्यान गांजाची विक्री करणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नरेश चीराज कंठेरिया (वय ३९ वर्षे), बेबी बॉक्स शेख (वय ४७ वर्षे) आणि हसमेन शेख (वय २७ वर्षे) यांचा समावेश आहे. आरोपींकडून एकूण ९ किलो ४२४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ३२ हजार ६०० रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणी अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपींकडे अधिक चौकशी सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलीस उपायुक्त राघवेंद्र आर. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सहायक पोलीस आयुक्त रेणुका बुटा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलीस निरीक्षक अजय कदम, तपासी अधिकारी तसेच पायधुनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी मुंबई पोलीस सातत्याने विशेष मोहीम राबवत असून, अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.