सांगवी-किवळे रस्त्यावरील रक्षक चौक सबवे व महात्मा फुले पुलाखालील बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे लोकार्पण; पिंपरी-चिंचवडच्या पायाभूत सुविधांना बळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी-किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे व्हेईक्युलर अंडरपास (VUP) तसेच महात्मा ज्योतिबा फुले पुलाखाली विकसित करण्यात आलेल्या बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Jul 24, 2026 - 03:24
 0  5
सांगवी-किवळे रस्त्यावरील रक्षक चौक सबवे व महात्मा फुले पुलाखालील बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे लोकार्पण; पिंपरी-चिंचवडच्या पायाभूत सुविधांना बळ
पिंपरी चिंचवड, PCMC, सांगवी किवळे रस्ता, रक्षक चौक सबवे, व्हेईक्युलर अंडरपास

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २३ जुलै : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सांगवी-किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथील व्हेईक्युलर अंडरपास (VUP) तसेच सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुलाखाली विकसित करण्यात आलेल्या बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचा समावेश आहे.

महात्मा फुले उड्डाणपूल परिसरात आयोजित कार्यक्रमाला ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, शिक्षण समिती सभापती रविना आंघोळकर, नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, शशिकांत कदम, शाम जगताप, नवनाथ जगताप, दिप्ती कांबळे, पल्लवी जगताप, शहर अभियंता मनोज सेठीथा, सह शहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, उपअभियंता चंद्रकांत मोरे तसेच परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले पुलाखालील मोकळ्या जागेचा प्रभावी वापर करून विकसित करण्यात आलेल्या बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पात आकर्षक सुशोभीकरण, फिरण्यासाठी पदपथ, बैठकीची व्यवस्था, व्यायामासाठी सुविधा, खुली जागा तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी उपयुक्त परिसर तयार करण्यात आला आहे. यामुळे पूर्वी दुर्लक्षित असलेल्या जागेचे नागरिकांसाठी उपयुक्त सार्वजनिक स्थळात रूपांतर झाले असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे.

दरम्यान, शहरातील वाढती वाहनसंख्या आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन सांगवी-किवळे मार्गावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेला व्हेईक्युलर अंडरपास (VUP) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत होऊन नागरिकांचा प्रवास वेळही कमी होण्यास मदत होणार आहे.

रक्षक चौक येथे झालेल्या कार्यक्रमाला ज क्षेत्रीय अध्यक्षा आरती सुरेश चोंधे, नगरसदस्य अॅड. विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, नगरसदस्या स्नेहा कलाटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा शिनकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, कार्यकारी अभियंता विजय भोजने, उपअभियंता निलेश दाते यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

महापालिकेच्या या विकासकामांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार असून शहराच्या पायाभूत विकासाला आणखी गती मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0